[ahmednagar] - राजकीय घडामोडींनी गाजले शिर्डीचे मैदान

  |   Ahmednagarnews

तिरंगी लढती व राजीनामा नांट्याने निवडणुकीतील रंगत वाढली

म. टा. प्रतिनिधी, नगर

नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुका यंदा कमालीच्या गाजल्या. विविध राजकीय घडामोडी घडवून गेल्या. नगरपाठोपाठ शिर्डीचा राखीव मतदारसंघही राजकीय घडामोडी घडवण्यात आघाडीवर राहिला. महिनाभरापूर्वी दिलेला विरोधी पक्षनेतेपदाचा राधाकृष्ण विखेंचा राजीनामा शिर्डीची निवडणूक अंतिम टप्प्यात आल्यावर काँग्रेसकडून स्वीकारला गेला, काँग्रेसचे महिनाभरापूर्वीच जिल्हाध्यक्ष झालेले करण ससाणे यांनी विखेंसाठी राजीनामा दिला, त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. भाजपने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची हकालपट्टी केली...अशा अनेक घटनांनी शिर्डीचे मैदान यंदा गाजले.

लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९मध्ये शिर्डी मतदारसंघ राखीव झाला. तेव्हापासूनच तो नेहमी राज्यभरात चर्चेत राहिला. त्यावेळच्या निवडणुकीत रिपब्लिकन चळवळीचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचा झालेला पराभव या मतदारसंघाला नेहमी प्रकाशझोतात ठेवून गेला. त्यानंतर मागील २००९च्या निवडणुकीत आठवलेंचा पराभव करून खासदार झालेल्या भाऊसाहेब वाकचौरेंनी २०१४मध्ये ऐनवेळी शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश व त्यांच्याकडून घेतलेली उमेदवारी आणि त्यांच्याविरोधात शिवसेनेने ऐनवेळी सदाशिव लोखंडेंना मैदानात उतरवण्याची खेळलेली खेळी, त्या काळात असलेली मोदी लाट व त्यात वाकचौरेंचा पराभव होऊन लोखंडेंना मिळालेली खासदारकी अशा अनेक घटनांतून शिर्डी नेहमी गाजत राहिले....

फोटो - http://v.duta.us/47k_JQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/z_6vmAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬