[ahmednagar] - वसंत टेकडीला टँकरच्या रांगा

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

पाणीपुरवठा योजनेचा खंडीत झालेल्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सात तासांचा अवधी लागला, मात्र, तोपर्यंत मुळा धरणातून पाणी उपसा बंद असल्याने नगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. वसंतटेकडी येथील टाकीमध्ये रविवारी सकाळपर्यंत पाणी न आल्याने येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टँकरच्या रांगा लागल्या होत्या.

ग्रामीण भागातील दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने तेथे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे. नगर तालुका व परिसरातील गावांसाठी रोज प्रत्येकी दहा हजार लिटर क्षमतेचे २३ ते २७ टँकर पाण्याच्या दोन खेपा महापालिकेच्या वसंतटेकडी येथील टाकीतून नेण्यात येतात. त्यामुळे वसंतटेकडी येथील टाकीजवळ पहाटेपासूनच टँकर येऊ लागतात. या टाकीतून रोज दोन ते तीन लाख लिटर पाणी टँकरसाठी दिले जाते. मात्र, शनिवारी नगर शहर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने मुळा धरणातून पाणी उपसा बंद होता. हा वीजपुरवठा सात तासांनंतर सुरळीत झाला. मात्र, मुळा धरणातून वसंतटेकडी येथे पाणी येण्यासाठी साधारण चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळे रविवारी सकाळी वसंतटेकडी येथील टाकी पूर्ण क्षमतेने भरली नसल्याने टँकरला पाणी देणे शक्य झाले नाही. त्यामुळे याभागात टँकरच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/I66GYwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬