[ahmednagar] - शिर्डी: स्पाइस जेटचे विमान धावपट्टीवरून घसरले

  |   Ahmednagarnews

शिर्डी :

शिर्डी विमानतळावर स्पाइस जेटचे विमान उतरताच धावपट्टीवरून घसरले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, दुर्घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

स्पाइस जेटचे एसजी ९४६ क्रमांकाचे विमान दिल्लीहून आले होते. शिर्डी विमानतळावर हे विमान उतरताच ही दुर्घटना घडली. विमान धावपट्टी सोडून पुढे गेल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सदर धावपट्टी काही काळासाठी बंद करण्यात आल्याचे विमानतळ संचालक दीपक शास्त्री यांनी सांगितले. या घटनेमुळे शिर्डीत येणाऱ्या व शिर्डीतून जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रखडण्याची शक्यता आहे.

फोटो - http://v.duta.us/fM3XUwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/A3r0EAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬