[ahmednagar] - सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

  |   Ahmednagarnews

अकोले : जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे (वय ३६) या तरुण शेतकऱ्याने सावकाराच्या कर्जाला व जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिक यांनी २३ एप्रिलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राजूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, वाल्मिक यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून तपास केल्यानंतर विलास दादाजी गोसावी यास अटक केली. त्याला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपी धुतडोकार दाजी, विनायक चोथवे, संतोष मुर्तडक व प्रा. बादशहा नारायण ताजणे यांच्यासह अन्य आरोपी फरारी आहेत. पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या घटनेला पाच दिवस उलटल्यानंतर वाल्मिक यांच्या भावजय व नातेवाइकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनी या घटनेतील संशयीत आरोपींची नावे पोलिसांना दिली होती. याबाबत ज्ञानेश्वर दिनेश आरोटे यांनी फिर्याद दिली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UqBZDwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬