[akola] - तरणतलाव परिसरात पालकांना ‘नो एन्ट्री’

  |   Akolanews

अकोला: शहरातील एकमेव असलेल्या वसंत देसाई क्रीडांगण येथील तरणतलावामध्ये उन्हाळी सुट्यांमध्ये पोहणे शिकायला ८ ते १४ वर्ष वयोगटातील मुले-मुली येतात. आपल्या मुलांसोबत काही अप्रिय घटना होऊ नये, यासाठी पालक वर्ग येथे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसतात; परंतु जलतरण तलाव परिसरात पालकांनी येऊ नये, असा आदेश जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी काढला असल्यामुळे पालक वर्गात रोष निर्माण झाला आहे.

पालकांनी तलाव परिसरात न येता बाहेरच थांबावे, असे देखील जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सुचविले आहे. यासंदर्भात पालकांसोबत बैठक घेऊन सर्व सूचना क्रीडा अधिकारी यांनी दिल्यात; परंतु आपल्या मुलांकडे प्रेक्षक गॅलरीत बसून लक्ष देता येईल, तसेच मुले कसे पोहतात, हे पाहता यावे, यासाठी पालक वर्गाला तरणतलाव परिसरात प्रवेश द्यावा, अशी मागणी पालक वर्गाची आहे....

फोटो - http://v.duta.us/GZc5MgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fRmBjgAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬