[akola] - प्राध्यापक पदभरती अवैध ठरण्याची शक्यता!

  |   Akolanews

अकोला: लोकसभा निवडणुकीचा महाराष्टातील शेवटचा टप्पा २९ एप्रिल संपत आहे. तसेच निवडणूक आयोगाने राज्यात प्राध्यापक पदभरती करण्यास मान्यता दिल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीसाठी मुलाखती घेणे शक्य आहे; परंतु ८ मार्चच्या शासन निर्णयानुसार विद्यापीठाने नवीन निवड समितीच निश्चित केलेली नाही. अशा परिस्थितीत जुन्या निवड समितीने केलेली उमेदवारांची निवड अवैध ठरू शकते.

महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर पदभरतीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. २९ एप्रिल नंतर मुलाखती घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे, मुलाखतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सहायक प्राध्यापकांच्या मुलाखती घेणे आता शक्य आहे; परंतु अद्याप शासनाने पदभरतीसंदर्भात नवीन निवड समितीच जाहीर न केल्याने महाविद्यालयांसमोर पेच पडला आहे. ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार, राज्य शासनाने सहायक प्राध्यापकांची पात्रता आणि वेतन श्रेणी ठरवली आहे; पण निवड समिती अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही. या निवड समित्या नंतर ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते; परंतु निवड समितीच नसल्याने महाविद्यालयांना मुलाखती घेता येणार नसल्याचे चित्र आहे....

फोटो - http://v.duta.us/PzKG4AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/sHwDygAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬