[akola] - पुलावरून पडुन सायकलस्वार ठार

  |   Akolanews

बोरगाव मंजू :

बोरगाव मंजु पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैलपाडा ते खडका रेल्वे स्थानक मार्गावरील काटेपूर्णा नदीच्या पात्रावरील पुलावरून पडुन एका ५४ वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, २९ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. सुरेश लक्ष्मण सोळंके रा.पैलपाडा असे मृतकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सुरेश लक्ष्मण सोळंके (रा.पैलपाडा) हे सायकलवरून जात असताना पैलपाडा ते खडका रेल्वे स्टेशन रोडवरील काटेपूर्णा नदीवरील पुल पार करत असता सायकल सह पुलावरून खाली पडले. यामध्ये जखमी झालेल्या सुरेश सोळंके यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी विष्णु ढोरे, अरुण गोपनारायण यांनी घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. नातेवाईकांकडून फिर्याद दिल्यावरून पोलीस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास बोरगाव मंजु पोलीस करीत आहेत....

फोटो - http://v.duta.us/Kh2xkgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WuHyrwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬