[akola] - मूर्तिजापूरात सिलेंडरचा भडका;भाजल्याने दोन जखमी

  |   Akolanews

मूर्तिजापूर : येथील सत्संग भवन परिसरात राहणारे वामन खंडागळे यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरातील चौघेजण जखमी झाले. सदर घटना सोमवारी दुपारी १:३० वाजताचे दरम्यान घडली. जखमींपैकी दोघे गंभीररीत्या भाजल्या गेल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घरातील गॅस सिलेंडरचा अचानक भडका झाल्याने घरात उपस्थित असलेले चौघेजण जखमी झाले. यामध्ये उज्वला वामन खंडागळे(५५), आणि शेजारील बालीका माही सुनील मार्कंड(४) या दोघी भाजलेल्याने गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. तर अजय वामनराव खंडागळे(२२), भिकाजी बळवंत सोनोने(७७) हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(शहर प्रतिनिधी)

फोटो - http://v.duta.us/ovpwRgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/vndWWAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬