[akola] - विद्यार्थ्यांना दूध भुकटी वाटपाचा प्रयोग फसला

  |   Akolanews

अकोला: इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातील खिचडीसोबत प्रायोगिक तत्त्वावर तीन महिने दूध भुकटी देण्याचा निर्णय नऊ महिन्यांपासून कागदावरच ठेवण्याचा प्रकार घडला आहे. जिल्हास्तरावरून शाळांतीलविद्यार्थी, त्यांना देय पाकिटांची संख्या याची माहिती घेण्याच्या पलीकडे शासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्यात २०० ग्रॅमचे एक पाकीट देण्याची तयारी शासनाने केली होती.

शालेय पोषण आहार योजनेमध्ये दूध, दूध भुकटीचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. त्याबाबतचा शासन निर्णय २३ आॅगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार शालेय पोषण आहारास पूरक योजना म्हणून दूध भुकटी वाटप योजना राबवण्याचे ठरले. विद्यार्थ्यांना दूध भुकटी (स्किम मिल्क पावडर) देण्यासाठी शाळास्तरावर वाटप करण्याचे नियोजनही देण्यात आले. एक महिन्याच्या कालावधीसाठी २०० ग्रॅम दूध भुकटीचे पाकीट अशी तीन महिन्यांसाठी ६०० ग्रॅमची पाकिटे विद्यार्थ्यांना घरी देणे आवश्यक होते. त्या भुकटीपासून पालकांनी घरी दूध तयार करून देण्याची पद्धतही समजावून सांगण्याची जबाबदारी संबंधितांवर देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थितीत एकाच दिवशी वाटप करण्याची कार्यपद्धतीही ठरवण्यात आली....

फोटो - http://v.duta.us/_eDAiwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-mLIKwAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬