[akola] - शरीराचे संतुलित तापमान करेल उष्माघातापासून बचाव!

  |   Akolanews

अकोला: उन्हाचा पारा सध्या आपलेच रेकॉर्ड मोडतो आहे. परिणामी, उष्माघात आणि त्यामुळे मृत्यू होण्याची भीतीही वाढली आहे. यापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर शरीराचे तापमान संतुलित राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

अकोल्यात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद मागील काही दिवसांपासून केली जात आहे. हीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमानदेखील प्रभावित होते. त्यामुळेच चक्कर येणे, उलट्या होणे, उन्हाळी सर्दी, डोकेदुखी, ताप येणे आणि जास्तच प्रभावित झाल्यास उष्माघाताची शक्यताही नाकारता येत नाही. शरीराचे तापमान गरजेपेक्षा जास्त वाढल्यास या प्रकारचे धोके संभावतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत उष्माघातापासून बचाव करायचा असेल, तर भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे....

फोटो - http://v.duta.us/7ZumOQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iW6LVQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬