[akola] - हातरुण परिसरातील १० गावात पाणीटंचाईच्या झळा!

  |   Akolanews

हातरुण: बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसर खारपाणपट्ट्यात येत असून अनेक गावात "एप्रिल हिट" मुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासकीय उदासीनतेमुळे आणि प्रशासकीय नियोजनाअभावी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नदी-नाल्यात पाण्याचा ठणठणाट असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचा मुहूर्त कधी निघतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

हातरुण परिसरातील १० गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. या गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र उपाययोजना करण्यात न आल्याने एप्रिल हिट च्या कडक उन्हात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू आहे. मागील वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. बोअरवेल कोरड्या पडल्या असून हातरुण, मालवाडा, लोणाग्रा, हातला, शिंगोली, मांजरी, अंदुरा, नया अंदुरा, कारंजा रमजानपूर, निंबा गावांना ऐन उन्हाळ्यात नैसर्गिक व कृत्रिम पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. या गावातील नागरिकांना पहाटेपासूनच सर्व कामे धंदे मोलमजुरी सोडून दिवसभर पाण्याच्या शोधात शेत शिवारात गाव शिवारात भटकंती करावी लागत आहे....

फोटो - http://v.duta.us/IGiJ-AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/AW3qCAAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬