[aurangabad-maharashtra] - अपघातात द्या माणुसकीचा हात

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांची नसती झंजट कशासाठी आणि मी तरी आधी का मदत करू... अशा द्वंद्वात अडकून न पडता रस्ते अपघातातील जखमीला तातडीने कशी मदत करता येईल व अशा जखमीचे प्राण कसे वाचवता येतील, याबाबत समस्त नागरिकांना हाक दिली आहे राज्यातील अस्थिरोगतज्ज्ञांनी. अशा अपघाताच्या समयी रुग्ण रुग्णालयात दाखल होईपर्यंत नेमक्या कोणकोणत्या बाबींना प्राधान्य देत नेमके कोणते प्रथमोपचार कसे केले पाहिजेत, याविषयी आठ महत्वपूर्ण सूचनाही अस्थिरोगतज्ज्ञांनी दिल्या आहेत आणि निमित्त आहे महाराष्ट्र अस्थिरोगतज्ज्ञ संघटनेच्या स्थापनादिनाचे.

एक मे हा संघटनेचा (एमओए) स्थापना दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवण्यात येते. त्याचाच भाग म्हणून यंदा 'रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात' हा उपक्रम राबवण्यात येत असून, २८ एप्रिल ते ४ मे या कालावधीपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून विविध मार्गे जनजागरण करण्यात येत आहे. रस्ते अपघातानंतर योग्य कृती कशी आणि अयोग्य कृती कशी, हे स्पष्ट करणारे दोन व्हिडिओ तयार करुन हा महत्वपूर्ण संदेश जनतेपर्यंत पोहचवण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपघातानंतर पळून न जाता मदतीसाठी थांबा, स्वत:सह जखमीला सुरक्षितस्थळी हालवा, रुग्णवाहिकेला फोन करुन नेमक्या ठिकाणाचा पत्ता देऊन बोलावून घ्या, रक्तस्त्राव होत असले तर जखमेवर स्वच्छ कपड्याने दाबून धरा किंवा कपडा बांधून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करा, जखमीला श्वास घेण्यास अडथळा असेल तर तो दूर करा, जखमीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करुन, त्याला धीर द्या, श्वास मोकळा होण्यासाठी जखमीला एका कुशीवर झोपवा, हात-पाय मोडला असेल तर कपडा बांधून त्या मोडलेल्या हात किंवा पायाला काठीचा आधार द्या, रुग्णवाहिका येताच जखमीला रुग्णवाहिकेत हलवा. हे करताना धडक देणाऱ्या चालकाशी वाद किंवा भांडण न करता आधी जखमीला मदत करण्याचा प्रयत्न करा आणि सुरुवात स्वत:पासून सुरू करा. कोर्टाच्या आदेशानुसार आता अपघातात मदत करणाऱ्यांना कोणत्याही चौकशांना सामोरे जावे लागत नाही, हेही लक्षात घ्या, असे आवाहन महाराष्ट्र अस्थिरोगतज्ज्ञ असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन देशपांडे, सचिव डॉ. प्रकाश शिगेदार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. या वेळी औरंगाबाद 'एमओए'चे शहर अध्यक्ष डॉ. एम. बी. लिंगायत, आयएमए शहर अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी, आयएमए शहर सचिव डॉ. यशवंत गाडे, डॉ. गोवर्धन इंगळे, डॉ. चंद्रशेखर साठे, डॉ. संदीप गवाळे, डॉ. संजय दुर्जन, डॉ. अजित शिंदे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/oBEKTwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬