[aurangabad-maharashtra] - छोटा हत्ती पुलाखाली कोसळून एक ठार १५ जखमी

  |   Aurangabad-Maharashtranews

वाळूज महानगर: औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील शिवराई फाट्याजवळील काळ्यापुलावर वऱ्हाडाच्या छोटाहत्ती चालकाचा ताबा सुटल्याने पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात एक ठार, तर १५ जण जखमी झाले. ही घटना रविवारी (२८ एप्रिल) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.

पडेगाव येथून लग्न समारंभ आटोपून संगमनेरकडे जाणारा छोटाहत्ती (एम एच १७ बी डी ६०६२) काळ्या पुलाखाली वीस फूट खोल कोसळला. यात सीताराम पाडुरंग चांगले (वय ७८, रा. मेंढवन, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला. सोमनाथ सीताराम चांगले, राजेंद्र नामदेव काटसरे, संगीता राजेंद्र काटसरे, शिल्पा सोमनाथ चांगले, निकिता निवृत्ती, दत्ता सोमनाथ फरांडे हे जखमी झाले. शिवराई येथील राजेंद्र तावरे, योगेश कुंजर, दिनेश राजपूत, आकाश साबळे, भानुदास भुंजंग व कनकोरी येथील अर्जुन पवार, आण्णासाहेब पवार, राम रोकडे यांनी अपघातग्रस्तांना पुलाखालून वर काढले. पोलिस उपनिरीक्षक रवीकुमार पवार, राजू वैष्णव, पांडुरंग शेळके, जयदीप आढे यांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. अमोल कोलते व राजू रोकडे यांनी जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

फोटो - http://v.duta.us/Z9CkQQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ve8LQwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬