[aurangabad-maharashtra] - पाणी चोरी थांबेना

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात विविध भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरूच असताना अनेक भागांतील उघड्या पाइपमधून अनधिकृत नळ जोडणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. नळ जोडणीसाठी फोडण्यात येणाऱ्या जलवाहिनी दुरुस्त करताना महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. शहानूरमिया दर्गा उड्डाणपुलाखाली जलवाहिनीतून रविवारी हजारो लिटर पाणी वाहून गेल्याचे समोर आले तर, पैठण येथे तांत्रिक अडचणीमुळे ही काहीवेळ पाणीपुरवठा थांबला होता.

जायकवाडी धरणाची उपयुक्त जलसाठ्याची पातळी शून्य टक्क्यांच्या खाली पोचली आहे. त्यात शहरात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची दमछाक झाल्याचे चित्र आहे. अनेक विभागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा नाही. सिडको-हडको जलकुंभावर दररोज ४०० टँकर सुरू असून, त्यात मागणीची आणखी भर पडते आहे. त्याचवेळी शहरातील उघड्या पाइपवरून रात्री बेकायदा नळ जोडणीकरून पाणी घेणाऱ्यांवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई होत नाही. रविवारी शहानूरमिया दर्गा पुलाच्या खाली अनाधिकृत नळांसाठी फोडण्यात आलेल्या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाहून गेले. पाच दिवसांपासून हे पाणी वाया जात असल्याचे सांगण्यात येते. बेकायदा नळ जोडणीसाठी किंवा पाण्यासाठी पाइप फोडल्यानंतर तो तसाच सोडून दिला जातो. त्यातून पाणी खाली सांडते व वाया जात आहे. अशा अनेक ठिकाणी दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी होत आहे. त्यावर उपाय काय करावा, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. नळासाठी पाइपला छिद्र पाडले जाते. त्यात पाणी सोडल्यानंतर पाण्याच्या अधिक दाबामुळ‌े हे पाइप निखळतात....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/D9dxtQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬