[aurangabad-maharashtra] - प्लास्टिक पिशवीत पाणी विकण्यास खंडपीठाची मान्यता

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पिण्याच्या पाण्याच्या पिशव्याची जाडी, फेरवापराची क्षमता आणि विस्तारित उत्पादक जबाबदारी ही अधिसूचनेच्या खंड चारप्रमाणे असेल तर, पिशवी निर्मिती करण्याचा व्यावसाय सुरू ठेवू शकतात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाल आणि न्यायमूर्ती ए. एम. ढवळे यांनी दिले, मात्र शासनाने निश्चित केलेल्या नियमावलींचे काटेकोरपणे पालन करूनच ही विक्री करता येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट केले.

'महाराष्ट्र पॅकेज्‌ड ड्रिकिंग वॉटर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन' यांच्यातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च २०१८ रोजी अधिसूचना आणि ११ एप्रिल २०१८ रोजी काढण्यात आलेले शुद्धीपत्रक रद्द करण्यात यावे, पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक पाऊचवर (पिशवी) लागू केलेली बंदी भेदभाव करणारी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्याच्या प्लास्टिक फेरवापरास योग्य नसताना देखील त्याच्यावर बंदी आणण्यात आली नाही मात्र, पिण्याच्या पाण्याचा पाऊच फेरवापरास योग्य असताना त्याच्यावर बंदी आणण्यात आली. हे समानतेच्या हक्काविरोधात आहे, असा दावा न्यायलयासमोर करण्यात आला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lHpphQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬