[aurangabad-maharashtra] - विधी, बीएडचे पेपर पुढे ढकलले

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सोमवारी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. विधी, बीएड, एमएड अशा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे पेपर कधी होणार याबाबतचे वेळापत्रकही विद्यापीठाने जाहीर केले. २९ एप्रिल रोजी राज्यातील १७ लोकसभा मतदार संघांत मतदान होत असून यापैकी अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विधी, बीएड, एमएड, शारिरिकशिक्षणशास्त्र, बीव्होक अशा पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षेचे पेपर होते. हे पेपर विद्यापीठ प्रशासनाने पुढे ढकलले आहेत. प्रवेश पूर्व परीक्षेमुळे विद्यापीठांतर्गत कॉलेजमध्ये राज्यभरातील विविध भागातून विद्यार्थ्यांना येथील विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला. चौथ्या टप्प्यातील १७ मतदारसंघातील मतदान आहे. ज्यामध्ये नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई आदी ठिकाणाहून विद्यार्थ्यांचे प्रवेश येथे आहेत. त्यामुळे त्या दिवशी पेपर ठेऊ नये, अशी मागणी पुढे आली होती. याबाबत प्रशासनाला निवेदनही देण्यात आले होते. अखेर विद्यापीठाने सोमवारी होणारा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत विद्यापीठाने म्हटले आहे की, विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात राज्याच्या अनेक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहे. विद्यापीठातर्फे विधी, शिक्षणशास्त्र व शारिरिकशिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचा २९ चा पेपर आता ३० एप्रिल रोजी होणार आहे. यासह सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ३० एप्रिल रोजी होणारी परीक्षा ५ मे रोजी घेतली जाणार आहे. तर, बीएस्सी अँड बीव्होक, बीकॉम, बीबीए आणि बीसीए (८०-२० पॅर्टन)ची २९ रोजी होणारी परीक्षा ५ मे रोजी होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/c8zNWQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬