[aurangabad-maharashtra] - शंभर बस धावण्यासाठी आणखी महिनाभराची प्रतीक्षा

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्मार्ट सिटी योजनेतून शहरात दीडशे सिटी बस धावणार, असे सांगण्यात येते. जानेवारीतच शंभर बस धावतील असे सांगणाऱ्या महापालिकेला त्याचे अद्याप नियोजन करता आले नाही. सध्या रस्त्यावर केवळ ३६ बसच धावत आहेत. नवीन ८१ बस दाखल झाल्या आहेत, परंतु त्याबाबतची कायदेशीर कार्यवाही नाही. शंभर बस रस्त्यावरून धावण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागेल, असे चित्र आहे.

शहर बससेवेचा शुभारंभ २३ डिसेंबरला युवासेनेच प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शंभर बस शहरातील रस्त्यावरून धावतील, असा दावा लोकप्रतिनिधींनी केला होता. प्रत्यक्षात एप्रिल संपला तरी शंभर बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. शहर बससेवेचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे बैठक झाली. एसटी महामंडळाचे प्रशांत भुसारी, सहायक आयुक्त सुरेश कवडे, मो. रा. थत्ते आदी प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी शहरात ३६ बसच धावत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शंभर बस केव्हा धावणार हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/iHpyUQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬