[aurangabad-maharashtra] - सिटी बस, कंटेनरचा ए. एस. चौकात अपघात

  |   Aurangabad-Maharashtranews

वाळूज महानगर: ए. एस. क्लब चौकात सिटी बस व कंटेनरच्या अपघातात तीन जण जमखी झाल्याची घटना रविवारी (२८ एप्रिल) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

रांजणगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसला (एम एच २० ई जी ९८५३) पैठण लिंक रोडकडून लासूरकडे जाणाऱ्या कंटेनरने (एम एच ०४ एच डी ५३४०) ने जोराची धडक दिली. यात बसचा डिझेल टाकीच्या बाजूचा पत्रा फाटून बस रस्त्याच्या खाली गेली. बस उलटली असती तर मोठा अपघात झाला असता. या अपघातात बसमधील रामप्रसाद काळे या प्रवाशाच्या पायाला व अंगाला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. चालक आर. जे. दांडगे व महिला वाहक ए. एस. कवडे हे किरकोळ जखमी झाले. चौकातील वाहतूक पोलिस संजय पाटील, राजेश शिंदे यांच्यासह नागरिकांनी बसमधून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी खाजगी वाहनातून घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे कंटेनरचालक गर्दीचा फायदा घेवून घटनास्थळावरून पळून गेला. अपघातामुळे कंटेनर महामार्गाच्या मधोमध थांबल्याने औरंगाबादकडून नगरकडे जाणारे व पैठण लिंकरोडकडून लासूरकडे जाणारी वाहतूक अर्धा तास खोळंबली होती. वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत राठोड, संजय पाटील, राजेश शिंदे, शेखर राऊतवार, दत्तात्रय गरड यांनी वाहतूक सुरळीत केली.

फोटो - http://v.duta.us/VVevmAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/U3oizgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬