[dhule] - धुळे, नंदुरबारसाठी आज मतदान

  |   Dhulenews

‌म. टा. वृत्तसेवा, धुळे

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान आज, सोमवारी (दि. २९) होणार असून, त्यात समाविष्ट असलेल्या धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होईल. उन्हाच्या झळा तीव्र असल्याने नागरिक अगोदरच हैराण असून, वाढत्या उन्हाचा मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

धुळे मतदारसंघात २८, तर नंदुरबार मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात आहेत. धुळे मतदारसंघात १९ लाख चार हजार ८५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात १८ लाख ७० हजार ११७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. धुळ्यात युतीचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे पुन्हा रिंगणात असून, त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आमदार कुणाल पाटील आणि बंडखोर अपक्ष अनिल गोटे यांचे आव्हान आहे. नंदुरबारमधून युतीच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांनाच उमदेवारी देण्यात आली असून, त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार आमदार अॅड. के. सी. पाडवी आणि अपक्ष डॉ. सुहास नटावदकर यांचे आव्हान असणार आहे. याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीचे उमदेवारही रिंगणात असून, मतदार आपल्या मतदानाचे दान कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/lhDxDgAA

📲 Get Dhule News on Whatsapp 💬