[dhule] - प्रशासनाची मतसज्जता

  |   Dhulenews

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (दि. २९) सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे. धुळे मतदारसंघातून २८,तर नंदुरबारमधून ११ उमेदवारांचे भवितव्य आज, सोमवारीमतदान यंत्रात बंद होईल. यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन पूर्ण सज्ज झाले असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी (दि. २८) सकाळी ९ वाजता धुळे व नंदुरबार शहरातील क्रीडा संकुलात मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांसह इतर साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मतदार केंद्रांपर्यंत जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बस व खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, सटाणा अशा सहा ठिकाणी एकूण १९४० मतदान केंद्रे असून, त्यावर ११ हजार मतदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी ६७७ वाहनांचा वापर करण्यात येणार असून, त्यासर्व वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांचे थेट प्रेक्षपण दिसणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात प्रशासनाकडून मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी 'वोटर सर्च'हे मोबाइल ॲप कार्यान्वित करून देण्यात आले आहे....

फोटो - http://v.duta.us/XTVlcQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/o-Z66gAA

📲 Get Dhule News on Whatsapp 💬