[goa] - ताळगावात 70.90 टक्के मतदान

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

ताळगाव पंचायतीच्या 10 प्रभागांत रविवारी 70.90 टक्के मतदान झाले. एकूण 16 हजार 209 मतदारांपैकी 11,492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी सोमवारी (दि.29) सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून 11 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येतील, असे सूत्रांनी सांगितले.

ताळगाव पंचायत क्षेत्रात 7,845 पुरुष आणि 8,364 महिला मिळून 16 हजार 209 मतदार आहेत. यापैकी 5,617 पुरुष आणि 5,875 महिलांनी रविवारी मतदानात भाग घेतला असून एकूण 11 हजार 492 (70.90 टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. सर्वाधिक मतदान 83.67 टक्के प्रभाग क्रमांक - 7 मध्ये झाले, तर सर्वात कमी 45.57 टक्के मतदान प्रभाग - 6 मध्ये झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याआधी 2014 साली झालेल्या सदर पंचायतीच्या निवडणुकीत 76.40 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीतील मतदानात 4 टक्क्यांची घट झाली आहे. ताळगाव पंचायतीत रविवारी मतपत्रिकेद्वारे मतदान झाल्याने प्रक्रियापूर्तीला अधिक वेळ लागत असल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या. उष्मा आणि लांबच लांब लागलेल्या रांगा यामुळे अनेक मतदार मतदान केंद्रावर फिरकलेच नसल्याचे समजते. बाबूश मोन्सेरात स्वत: हिरव्या रंगाच्या एका दुचाकीवरून ताळगावातील सर्व प्रभागांमधील मतदान केंद्रांवर फिरत असताना दिसले. आमदार जेनिफर यांनी आपल्या दोन्ही पुत्रांसमवेत मतदान केले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/70-90-percent-voting-in-Talgaon-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/70-90-percent-voting-in-Talgaon-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬