[goa] - तुळशी वृंदावनाची नासधूस; बाप्सोरात दोन गटांत तणाव

  |   Goanews

मडगाव : प्रतिनिधी

बेतूल येथील बाप्सोरा भागातील वेताळ देवस्थानच्या आवारातील तुळशी वृंदावनाची अज्ञातांनी नासधूस केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पसरताच हिंदू आणि ख्रिश्चन धर्मातील सुमारे एक हजार लोक घटनास्थळी जमल्याने गावात तणाव निर्माण झाला. मात्र दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले.

सविस्तर माहितीनुसार बाप्सोरा येथे वेताळ देवस्थानाच्या आवारात सदर तुळशीचे वृंदावन उभारण्यात आले होते. रविवारी सकाळी लोकांना तुळशी वृंदावनाची नासधूस केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. काही लोकांनी 27 रोजी शनिवारी मध्यरात्री हेल्मेट घातलेल्या काही बाईकस्वार युवकांनी वेताळ देवस्थानच्या परिसरात प्रवेश करून

तुळशी वृंदावनाची नासधूस केल्याचे आपण पाहिल्याचा दावा केल्यानंतर धार्मिक वादाला तोंड फुटले होते. लोकांनी त्वरित या प्रकरणाची माहिती कुंकळ्ळी पोलिसांना दिल्यानंतर कुंकळळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, याच भागातील ख्रिश्चन समाजाचे लोकसुद्धा या ठिकाणी जमा झाले. दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मडगाव, मायणा कुडतरी, केपे, कोलवा तसेच काणकोण पोलिस स्थानकाची कुमक या ठिकाणी मागवण्यात आली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/tension-in-two-group-at-bapsora-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/tension-in-two-group-at-bapsora-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬