[goa] - भाजपकडून अखेर सिद्धार्थ कुंकळ्येकर

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रविवारी संध्याकाळी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची उमेदवारी भाजपचे केंद्रीय निवडणूक समितीचे सचिव जगत प्रकाश नंदा यांच्याकडून जाहीर करण्यात आली. पणजीतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रतिष्ठितांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचे नाव उमेदवारीच्या शर्यतीतून हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पणजी गट मंडळ, नगरपालिका नगरसेवक, कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून मत जाणून घेऊन उत्पल पर्रीकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर ही दोन नावे दिल्लीस्थित केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली. उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असून त्याच्या पूर्वसंध्येला भाजपकडून पणजी पोटनिवडणुकीसाठी कुंकळ्येकर यांचे नाव घोषित करण्यात आले.

पणजी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे सांताक्रुजचे माजी आमदार अतानसिओ (बाबूश) मोन्सेरात हा बलाढ्य उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. गोसुमंतर्फे माजी संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर आणि ‘आप’तर्फे वाल्मिकी नाईक हे उमेदवार असून भाजप वगळता अन्य सर्व उमेदवारांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. निवडणुकीचा अनुभव असलेल्या या उमेदवारांसमोर उत्पल पर्रीकर हे नवखे आणि काहीसे अपरिचित ठरण्याच्या शक्यतेने भाजपने कुंकळ्येकर यांच्या बाजूने कौल दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Siddharth-Kunklekar-BJP-candidate-from-panji-goa/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/Siddharth-Kunklekar-BJP-candidate-from-panji-goa/

📲 Get goanews on Whatsapp 💬