[jalgaon] - खान्देशात सूर्याचा ‘ताप’

  |   Jalgaonnews

जळगाव, धुळ्यात कमाल पारा ४५ अंशावर

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा पुन्हा वाढला असून, नागरिकांना या झळा असह्य होत आहेत. शहराचे रविवारी (दि. २८) तापमान भारतीय हवामान संकेतस्थळानुसार कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर धुळे, नंदुरबारलाही कमाल तापमान ४५ अंशावर गेल्याने उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्यातच हे तापमान असल्याने मे महिन्यात सूर्य किती तळपणार याबाबतची चर्चा सुरू आहे. तीन दिवस उष्णतेची लाट असल्याचा इशाराही सूत्रांकडून देण्यात आला असून, नागरिकांनी दुपारच्या वेळी महत्त्वाच्या कामालाच बाहेर निघावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

जळगाव शहरात सकाळपासून ऊन जाणवत असून, सकाळी १० वाजेपासून सूर्य तापायला सुरुवात होत आहे. शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत स्मार्टफोननुसार कमाल तापमान हे ४६ ते ४७ अंशांपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे. चोपडा, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, जामनेर या तालुक्यात तापमानाने चाळीिशी कधीच पार केलेली आहे. याठिकाणी पाणीटंचाईच्याही झळा नागरिकांना सहन कराव्या लागत असून, आता उन्हाने त्यात भर टाकली आहे....

फोटो - http://v.duta.us/Td-iHQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/YRPVTQAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬