[jalgaon] - भुसावळात एकावर चाकू हल्ला

  |   Jalgaonnews

पूर्ववैमनस्यातून झाला प्रकार

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भुसावळ येथील अयान कॉलनीतील रहिवाशी आशिक बेग असलम बेग (बाबा काल्या) याच्यावर शनिवारी (दि. २७) मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांचा तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

एका प्रकरणात आशिक बेग असलम बेग याची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली होती. आशिक बेग हा शनिवारी घरीच होता. त्याच्यावर मध्यरात्री अडीच वाजेच्या दरम्यान तीन ते चार जणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात आशिक बेग असलम बेग हा जखमी झाल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस स्टेशनला याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3uId7AAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬