[kolhapur] - आंब्याच्या ४५ हजार बॉक्सची आवक

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी,

मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चार दिवसांत ४५ हजार, ७२४ बॉक्स आणि ३३८७ पेटी आंब्याची आवक झाली असून खरेदी विक्रीत दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याबरोबर मद्रास हापूस व पायरी आंब्याचेही बाजारात आगमन झाले आहे. हापूस आंब्याची प्रतिडझन ३०० ते ६०० रुपयांनी विक्री होत असून हा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याने दर कमी होण्याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवड्यात मार्केट यार्ड येथे चार दिवसांत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे. २३ एप्रिल रोजी मतदान आणि २६ एप्रिलला साप्ताहिक सुट्टी असतानाही कोकणासह दक्षिण भारतातून उत्पादकांनी कोल्हापुरात आंबा पाठवला आहे. लोकसभा मतदान संपल्यानंतर बुधवारी (ता. २४) रोजी हापूस आंबा, पायरी, लालबाग, मद्रास हापूस आणि पायरी जातीच्या आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली....

फोटो - http://v.duta.us/T9yWUgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/EpVy4wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬