[kolhapur] - ‘केशवराव’च्या एसीत बिघाड

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण करताना लाइट अँड साउंड, वातानुकूल यंत्रणा, अद्ययावत स्टेज अशा नवीन तंत्रज्ञानाचा अतिशय कुशलतेने वापर केला. परिणामी नाट्यगृहातील अद्ययावत वस्तूंच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. नूतनीकरणानंतर बसविलेली वातानुकूलित यंत्रणा ऑगस्टपासून बंद आहे. प्रेक्षकांना गारवा देणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने त्यांना नाट्यगृहात अक्षरश: घाम फुटत आहे.

नाट्यगृहाचे नुतनीकरण करताना नाट्यगृहात गारवा व वातावरण आल्हादायी राहण्यासाठी सात ते आठ ठिकाणी वातानुकूल यंत्रणा कार्यान्वित केली. वातानुकूल यंत्रणा व नाट्यगृहातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, त्यासाठी १२५ केव्हीचा जनरेटरही बसविला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटरच्या मदतीने तो कायम करण्यात येतो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला तरी नाट्यगृहातील यंत्रणेवर त्याचा परिणाम होत नाही. मात्र, नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेपैकी बाल्कनीच्या खालच्या बाजूकडील यंत्रणा ऑगस्टपासून बंद पडली आहे. याबाबतची माहिती नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने महापालिकेच्या विद्युत विभागाला देऊन दुरुस्तीसाठी तीन लाख निधीची मागणी केली. मात्र, नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही दुरुस्तीसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे आता उन्हाचा तडाखा सुरू झाल्यानंतर त्याचे परिणाम समोर येऊ लागला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rjFoTwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬