[kolhapur] - धरणांतील पाणीपातळीत घट

  |   Kolhapurnews

शेतीच्या पाणी वापरावर निर्बंध, टंचाईचे संकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील प्रमुख सात धरणांतील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजघडीला उपलब्ध पाणी कमी आहे. यामुळे शेतीसाठीच्या पाण्यावर पाटबंधारे प्रशासनाने उपसाबंदी करून निर्बंध आणले आहेत. मॉन्सूनचा पाऊस लांबल्यास शहरासह औद्योगिक प्रकल्पांनाही पाणी टंचाईची झळ बसणार आहे.

वाढत्या उष्यामुळे धरणातील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. बाष्पीभवन, शेती, पिण्यासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणांतील पाणी तळ गाठत आहे. राधानगरी धरणाची एकूण क्षमता ८. ३६ टीएमसी आहे. त्यामध्ये आता केवळ २. ३८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. या धरणातील पाणी पंचगंगा नदीतून शिरोळ, कर्नाटकपर्यंत जाते. सध्या या धरणातून १ हजार घनफुट प्रती सेकंद विसर्ग सुरू आहे. 'तुळशी'ची क्षमता ३.५ टीएमसी आहे. तेथे फक्त १.४५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. काळम्मावाडी धरणाची क्षमता २५.४० टीएमसी असताना तेथे ५.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्हींसह राधानगरी धरणातील पाणी पातळी घटण्याचा वेग असाच राहिला तर शहरालाही पाणी टंचाईची झळ बसणार आहे. म्हणून पाटबंधारे प्रशासन उपासाबंदी करून पाणीसाठा राखून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातूनच पंचगंगा नदीवर २७ आणि २८ एप्रिल व १२ ते १५ मे दरम्यान उपसाबंदी लागू केली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZEnlqAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬