[kolhapur] - निपाणी-देवगड मार्गाला ब्रेक

  |   Kolhapurnews

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने निपाणी ते देवगड मार्गाचे काम सुरू आहे. याच मार्गावरील सोळांकूर ते मांगेवाडी दरम्यानच्या मार्गावर काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. मात्र, पाइपलाइन टाकण्यास सोळांकूर ग्रामपंचायतीने अद्याप परवानगी दिली नसल्याने सुमारे साडेतीन किलोमीटरच्या राज्य मार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. रस्त्याचे काम त्वरित होण्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी पुन्हा एकदा महापालिकेने ग्रामपंचायतीकडे केली.

शहरवासीयांना काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना सुरू आहे. योजनेच्या परवानगीबाबत अनेकपातळीवर घोळ असताना ज्या गावातून पाइपलाइन टाकली जाणार होती, त्यातील अनेक गावांनी सुरुवातीस विरोध केला. त्यामध्ये प्रामुख्याने सोळांकूर, कपिलेश्वर, तुरंबे, सोळंबी, हळदी आदी गावांचा समावेश होता. ग्रामपंचायतींचा विरोध दूर करण्यासाठी प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढला. पण सोळांकूर येथील प्रश्न अद्याप निकालात निघालेला नाही. ज्याठिकाणी विरोध होईल तेथील काम थांबवून पुढील टप्प्यातील काम करण्यास सुरुवात केली. परिणामी ४४ किमीची पाइपलाइन टाकण्यात आली असून केवळ वन विभाग व सोळांकूर गावातील अशी सुमारे नऊ किमी पाइपलाइनचे काम ठप्प झाले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/7_QDbwEA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬