[kolhapur] - पंचगंगा प्रदूषमुक्तीसाठी ४८० कोटींचा आराखडा

  |   Kolhapurnews

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी 'नमामी'चा दर्जा मिळण्यासाठी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय सविस्तर प्रस्ताव तयार करीत आहे. केंद्र सरकारच्या नमामी गंगेच्या धर्तीवरचा हा प्रस्ताव तयार करण्यात आहे. यासाठी कोल्हापूरसह पंचगंगा खोऱ्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कृती आराखडा, कामनिहाय आवश्यक निधीची माहिती घेतली जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने आता सुरू असलेल्या प्रकल्पाशिवाय उर्वरित कामांसाठी ४८० कोटींची आवश्यकता असल्याची माहिती नुकतीच दिली आहे. पन्हाळा नगरपालिकेने तीन कोटींतून सांडपाणी प्रक्रिया आणि घनकचरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन दिले आहे.

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी भरीव निधीची गरज आहे. 'नमामी'योजनेत या नदीचा सामावेश झाल्यास आवश्यक निधी मिळू शकतो. यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर पंचगंगेला नमामीचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासन करत आहे. त्यांनी पंचगंगा खोऱ्यातील एकूण गावे, औद्योगिक वसाहत, साखर कारखाने, शेतीचे क्षेत्र, त्यामध्ये वापरण्यात येणारी रासायनिक खते, औषधांचा वापर यांची माहिती संकलित केली जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी तात्पुरते आणि कायमस्वरुपी उपाययोजना आणि भविष्यातील प्रकल्प आणि इतर कामांसाठी लागणाऱ्या निधीच्या आकडेवारीसह कृती आराखडा एकत्र केला जात आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/02eWKwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬