[kolhapur] - परीक्षा संचालकांकडून वसुली करा

  |   Kolhapurnews

लोगो : शिवाजी विद्यापीठ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभातील एका सहीचा घोळ, दुबार प्रमाणपत्र छपाईच्या चौकशीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना उपलब्ध झाला. त्या अहवालात एका सहीची २४ हजार २४६ प्रमाणपत्रे छापली असून एकूण खर्च चार लाख ८९ हजार, ७६९ रुपये इतका झाला होता. ही रक्कम दीक्षान्त विभाग व परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालकांकडून वसूल करावी, अशी शिफारस केली आहे. दरम्यान चौकशी समितीचा अहवाल वादग्रस्त ठरला आहे.

विविध विद्यार्थी संघटना व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने एका सहीचा घोळ हा कुलगुरूंच्या आदेशामुळे झाला असताना त्यांच्यावर चौकशी समितीने कोणताही आक्षेप घेतला नाही तसेच जबाबदारी का निश्चित केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक सोमवारी (ता. २९) होत आहे. चौकशी अहवालावरून ही बैठक गाजण्याची स्पष्ट चिन्हे आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/x9ANMgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬