[kolhapur] - पारा उतरला, पण उष्मा कायम

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचे चटके, उष्मामुळे होणारी अंगाची लाही लाही यामुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांना रविवारी तापमानाचा पारा कमी झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला. दुपारपर्यंत शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते, त्यामुळे तापमान ३७.७ अंशांपर्यंत खाली आले. पारा उतरला असला तरी हवेतील उष्मा कायम होता. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ३० लाखांच्या आसपास नुकसान झाले आहे. आजरा, हातकणंगले, आजरा आणि चंदगड तालुक्यातील घरांची पडझड झाली.

रविवारी सुट्टीचा दिवस असूनही दुपारच्या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ कमी होती. सायंकाळनंतर प्रमुख बाजारपेठा, मार्गावरील वर्दळ वाढली. मात्र उष्मा सहन होत नसल्यामुळे नागरिकांनी आइस्क्रीमची दुकाने, शीतपेयांना पसंती दिली. उन्हाच्या चटक्यापासून सुटका करून घेताना नागरिकांनी शहरातील उद्यानांत गर्दी केली होती. महापालिकेच्या मालकीच्या उद्याने दुपारनंतर फुलली होती. शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील तापमान ४१ अंशांवर पोहचले होते. असह्य करणाऱ्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक हैराण बनले आहेत. शनिवारी सायंकाळी शहरात पावसाचा शिडकावा झाला तर जिल्ह्यातील विविध भागात पावसाने तडाखा दिला होता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/aG5A9wAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬