[maharashtra] - चौथ्या टप्प्यातही मतदान यंत्र बिघडण्याची समस्या कायम

  |   Maharashtranews

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदार संघाच्या बाहेर रांगा पाहायला मिळत आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आज मतदार पेटीत बंद होणार आहे. पण चौथ्या टप्प्यातही मतदान यंत्र बिघडण्याची समस्या कायम राहिली आहे. मतदान सुरू होताच नाशिकच्या विहितगाव केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. मतदान केंद्र क्रमांक १०७ मधील यंत्रणा बिघडली. याच केंद्रावर युतीचे उमेदवार हेमंत गोडसे मतदान करणार आहेत. तर धुळ्यातही गरताड मतदान केंद्रावर यंत्रणा बिघडली काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांचं इथे मतदान होतं. दरम्यान नाशिकमध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर पोलिंग एजंटला जाऊ न दिल्याने वाद निर्माण झाला आणि उमेदवार समीर भुजबळ यांना इथे यावं लागलं. ओळखपत्रावरून पोलिसांशी त्यांचा वाद झाला....

फोटो - http://v.duta.us/pU0yIgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UK83XwAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬