[maharashtra] - शिर्डीत स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवरून घसरले

  |   Maharashtranews

मुंबई: शिर्डी विमानतळावर सोमवारी स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवरून घसरल्याची दुर्घटना झाली. यावेळी विमान धावपट्टी सोडून बाजूच्या माळरानात जाऊन थांबले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे शिर्डी विमानतळावरील हवाईसेवा उद्यापर्यंत ठप्प झाली आहे. स्पाईसजेटचे हे विमान पुन्हा धावपट्टीवर आणण्यासाठी मुंबई आणि दिल्लीतील एक कर्मचाऱ्यांचे पथक शिर्डीच्या दिशेने रवाना झाले आहे. आज रात्रीपर्यंत हे पथक शिर्डीत पोहोचेल. यानंतर विमान धावपट्टीवर आणण्याच्या कामाला सुरुवात होईल.

स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवर उतरताना हा अपघात झाला. हे विमान दिल्लीहून शिर्डीला येत होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. धावपट्टीवरून पार्किंगकडे येताना वळणावर ते दगड माती असलेल्या जागेवर खाली उतरले व रुतून बसले. विमान धावपट्टीवरून घसरल्यानंतर तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. विमातळावरील कर्मचाऱ्यांनी विमानाजवळ जाऊन प्रवाशांना सुखरुपपणे खाली उतरवले.

फोटो - http://v.duta.us/RSDEpgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Hqij6wAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬