[mumbai] - ऑस्ट्रेलियन हाय कमिशनकडून मुंबईतील निवडणूक प्रक्रियेची पाहणी

  |   Mumbainews

मुंबई:

भारतात होत असलेल्या लोकसभा निवडणूकीतील मतदान व निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन हाय कमिशनचे शिष्टमंडळ आज मुंबईत आले. त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. तसेच मतदान केंद्रावर जावून मतदान यंत्रणेची पाहणी केली.

सर्वप्रथम या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी स्वागत केले. तसेच त्यांना मा. भारत निवडणूक आयोगाच्या कार्याविषयी संगणकीय सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली, व व्हीव्हीपॅट व इव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर, उपजिल्हाधिकारी तरूणकुमार खत्री, उपजिल्हाधिकारी कृष्णकुमार मुर्ती तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेबाबतची चित्रफीत त्यांना दाखविण्यात आली यातील निवडणूक कार्यपद्धतीची भव्यता पाहून त्यांनी आश्चर्य व कुतूहल व्यक्त केले. तसेच यातील प्रत्येक बाबीची माहिती त्यांनी समजून घेतली....

फोटो - http://v.duta.us/MbnrIwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5gWBnQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬