[mumbai] - पाणीभान आणण्यासाठी ग्राहक पंचायत, ‘आहार’चे प्रयत्न

  |   Mumbainews

'पाणी माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात

पाणी जपून वापरण्याचे हॉटेलग्राहकांना आवाहन

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकर पाणी पैसे भरून घेतात. इथे डोक्यावर हंडे आणि कळशा घेऊन किंवा सायकलवर ड्रम बांधून पाणी आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे पाण्याचा वापर थोडा सढळपणे होतो. मात्र हेच पाणीभान देण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत आणि हॉटेल मालकांची आहार ही संघटना यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पाणीबचतीसंदर्भात दादर पूर्व, पश्चिम आणि सायन येथील हॉटेलमध्ये पोस्टर झळकवण्यात आले आहेत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर 'पाणी माझी जबाबदारी' ही मोहीम मुंबई ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आली. यामध्ये पाणी वाचवण्यासाठी तुम्ही काय करता, त्याबद्दल माहिती देण्याचे मुंबई ग्राहक पंचायतीच्या सभासद महिलांना आवाहन करण्यात आले. या अंतर्गत महिलांनी या आवाहनला भरभरून प्रतिसाद देत पाणीबचतीचे लहान-लहान उपाय सुचवले. काहींनी कवितांमधून अभिव्यक्ती केली. लहान मुलांना पाणीबचतीच्या अनुषंगाने चित्रे काढण्याचे आवाहन करण्यात आले. मुलांच्या चित्रांचे फोटो काढण्यात आले. त्याचा व्हिडीओ काढून त्याचा वापर पाणीबचतीबद्दल जनजागृतीसाठी करण्यात आला, अशी माहिती मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्या रंजना मंत्री यांनी दिली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/8uwriQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬