[mumbai] - परभणी, अकोला, चंद्रपुरात पारा @४७.२

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील उष्णतेच्या लहरीमुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथे वाढलेल्या तापमानाचा फटका नागरिकांना बसला आहे. रविवारी जगातील सर्वाधिक तापमानाच्या नोंदीत पहिल्या १५ शहरांमध्ये राज्यातील आठ शहरांची नोंद झाली आहे. यात अकोला, चंद्रपूर, परभणी, ब्रह्मपुरी, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि जळगाव या शहरांचा समावेश आहे. अकोला, चंद्रपूर, परभणी या शहरांमध्ये तापमानाचा पारा रविवारी ४७.२ अंशांवर पोहोचला. यामध्ये परभणी शहरातील तापमानाने एप्रिलमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाल तापमानाचा उच्चांक गाठला. तर अकोल्यातही गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

एल डोराडो या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार जगातील सर्वांत १५ उष्ण शहरांपैकी १४ शहरे देशातील आहेत. मध्य प्रदेशातील खारगोन येथे देशातील आणि जगातील सर्वाधिक कमाल तापमान रविवारी नोंदवण्यात आले. खारगोन येथे तापमानाचा पारा ४७.५ अंशांपर्यंत पोहोचला होता. एप्रिलमधील या उन्हाच्या तडाख्यानंतर मेमध्ये आणखी टोकाचा उन्हाळा सहन करावा लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भामध्ये रविवारी सर्वांत कमी कमाल तापमान गडचिरोली येथे ४३ अंश सेल्सिअस होते. अकोला आणि चंद्रपूरशिवाय अमरावती, वर्धा, ब्रह्मपुरी, यवतमाळ येथे तापमान ४५ अंशांहून अधिक होते. ही परिस्थिती आणखी दोन दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे....

फोटो - http://v.duta.us/OYcXNAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mzDODwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬