[mumbai] - बोरीवलीत दोन ठिकाणी मतदान खोळंबा, मतदार परतले

  |   Mumbainews

मुंबई:

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील बोरीवली पश्चिमेकडील दोन मतदारसंघात मतदान सुरू झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला आहे. सकाळी लवकर येऊनही मतदानास सुरुवात न झाल्याने तासभर रांगेत तिष्ठत रहावं लागल्यानंतर अनेक मतदार माघारी परतले. त्यामुळे या मतदान केंद्रावर सकाळी गोंधळाचं वातावरण पाह्यला मिळालं.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील बोरीवली पश्चिमेकडील गोराई वन एरिया येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल बुथ क्रमांक ५० वर मतदारांनी पहाटे साडे सहा वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र सातनंतरही मतदान सुरू न झाल्याने मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. मतदान उशिरा सुरू होण्यामागचं कोणतंही कारण मतदारांना सांगण्यात आलं नाही किंवा मतदान किती वाजता सुरू होईल याचीही माहिती देण्यात आली नाही, त्यामुळे मतदारांनी तासभर वाट पाहून मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला. हीच परिस्थिती सुविधालय शाळेतही होती. तिथेही ७ वाजल्यानंतरही मतदान सुरू न झाल्याने रांगेत तिष्ठत उभे असलेले मतदार वैतागले होते.

फोटो - http://v.duta.us/JcW_IwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/fsu3ngAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬