[mumbai] - मन सुद्ध तुझं... मराठी मतदारांना उर्मिलाचं अनोखं आवाहन

  |   Mumbainews

मुंबई:

लोकसभा निवडणुकांसाठी आज मुंबईतील सर्वच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने मराठी मतदारांना अनोख्या पद्धतीने मतदान करण्याचं आवाहन केलं. शुद्ध मनाच्या मतदारराजाने आज घरातून बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावं असं तिने एका गीताच्या माध्यमातून सांगितलं.

मुंबईत आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रीघ लागली आहे. उर्मिला मांतोडकरनेही आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर उर्मिलाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा तिन्ही भाषांमधून मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं. 'लोकांनी देशासाठी ,त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यासाठी मतदान करावं, सुट्टीचा आनंद नंतर घ्यावा.' असं आवाहन तिने हिंदी-इंग्रजीतून केलं.

पण मराठी मतदारांना तुम्ही काय सांगाल असा प्रश्न विचारला असता उर्मिला म्हणाली.’ मराठी मतदारांसाठी एक गाणं सकाळपासूनच माझ्या डोक्यात चाललं आहे’ त्यानंतर ‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची’ या प्रसिद्ध सिनेगीताच्या दोन ओळीही तिने गायल्या. शुद्ध मनाच्या मतदाराराजाने आज मतदान करावंच असं सूचक आवाहन तिनं केलं . ‘हे (गाणं) सर्वच मतदारांकरता आहे. त्यांनी घरातून बाहेर निघावं आणि मोठ्या संख्येने मतदान करावं’....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uM7dvQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬