[mumbai] - मुंबई, ठाण्यात मतदानटक्का घसरण्याची चिंता

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी,

शनिवारपासून सलग दोन दिवस असलेल्या सुट्ट्या तसेच उन्हाचा पारा चाळिशीत घरात गेल्यामुळे मुंबईतील सहा आणि शेजारच्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील चार, अशा १० मतदारसंघांत मतदानाचा टक्का घसरणार काय या भीतीपोटी सर्वपक्षीय उमेदवारांच्या पोटात गोळा आला आहे. परीक्षा झाल्यामुळे शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून, अनेक मतदार आपापल्या गावी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि उत्तर प्रदेशात रवाना झाल्यामुळे राजकीय पक्षांची नेतेमंडळी चिंतेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगातर्फे तसेच लोकशाही रक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे मतदारांसाठी जाणीव जागृतीचे उपक्रम राबविण्यात येतात. यंदाच्या निवडणुकीत १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांनी १०० टक्के सहभाग नोंदवावा यासाठी व्हॉटसअॅप सेल्फी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मतदान केंद्रावर कोणत्याही मतदाराला मोबाइल फोन घेऊन जाता येणार नाही अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे मोठे परिश्रम उमेदवारांच्या प्रतिनिधींना घ्यावे लागणार आहे....

फोटो - http://v.duta.us/7LmljQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rlp4oAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬