[mumbai] - मुंबई: बेस्टच्या ५०० बस निवडणूक कामी

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेसाठी बेस्ट उपक्रमाच्या ५०० हून अधिक बस सेवेत सामावून घेतल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात सुमारे ३,५०० बस असून त्यापैकी ४४९ बस निवडणूक आयोगाकडून आणि ७३ बस मुंबई पोलिसांकडून उपयोगात आणल्या जात आहेत. शनिवारपासून या बस निवडणूक कर्तव्यासाठी सामावून घेण्यात आल्या आहेत. या बसची एकूण संख्या ५२२ इतकी आहे. रस्त्यावरील बससंख्येत अचानक कपात झाल्याने मुंबईकरांना काहीशा अडचणींना तोंड द्यावे लागले. निवडणूक संपल्यानंतरच या सर्व बस पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होतील.

लोकसभा निवडणूक योग्यरित्या पार पडावी यासाठी संपूर्ण शहर व उपनगरात नियोजन केले आहे. सोमवारी प्रत्यक्ष मतदान होणार असून त्यापूर्वी रविवारी संपूर्ण यंत्रणा स्थिरस्थावर केली जाते. त्याप्रमाणे रविवारी सर्वच मतदान केंद्रांवर निवडणुकीशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती. त्यांच्या वाहतुकीसाठी बेस्ट बसचा वापर केला जातो. त्याप्रमाणे केवळ निवडणुकीशी संबंधित कामांसाठी रविवारपर्यंत ३४९ बसचा वापर करण्यात आला. मुंबई पोलिसांनीही बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बेस्टच्या बसचा वापर केला आहे. त्यांची संख्या ७३ इतकी आहे....

फोटो - http://v.duta.us/efL-OAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Q4oyDgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬