[mumbai] - सरकारी जाहिरातींवर ४७ कोटी रुपये खर्च

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

निवडणुकीचे वर्ष आले की सरकारी जाहिरातींच्या संख्येतही आपसूकच वाढ होऊ लागते. २०१८-१९मध्ये राज्य सरकारने जाहिरातींवर खर्च २०१७-१८ च्या तुलनेत दुपटीने जास्त असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यात वृत्तपत्रे, टीव्ही, मासिकांचा समावेश आहे. २०१७-१८ मध्ये जाहिरातींचा खर्च २२ कोटी ५१ लाख रुपये होता. २०१८-१९मध्ये हा आकडा ४७ कोटी रुपयांवर गेल्याचे माहिती अधिकाराच्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकारकडून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यामार्फत जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. तसेच राज्य सरकारच्या विविध विभागांतर्फे स्वतंत्रपणे जाहिराती केल्या जातात. जितेंद्र घाडगे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून माहिती अधिकाराखाली जाहिरातीच्या खर्चांचे तपशील मागितले. त्यावर टीव्ही-वृत्तपत्रे-मासिकांवरील जाहिराती खर्चांचा तपशील देण्यात आला आहे.

या माहितीनुसार मासिकांवरील खर्च सर्वांत जास्त असून त्यापाठोपाठ टीव्ही आणि वृत्तपत्रांचा क्रमांक लागतो....

फोटो - http://v.duta.us/wZkNRgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/oHkHKAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬