[mumbai] - सहा हजार होमगार्डची कुमक

  |   Mumbainews

प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टर

मुंबई

मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणखी भक्कम करण्यासाठी राज्यातील विविध भागांतून सहा हजार होमगार्डची अतिरिक्त कुमक मुंबईत दाखल झाली आहे. यामध्ये नागपूर, गडचिरोली, बीड, सोलापूर, बुलडाणा, नांदेड आणि मुंबईतील होमगार्डचा समावेश आहे. या प्रवासात आरोग्याची हेळसांड, सततची धावपळ, भत्ता मिळण्यातील अनिश्चितता, प्रमाणपत्र अडवणूक, आंदोलनाचे पडसाद अशा अनेक अडचणींना ही मंडळी सामोरे जात आहेत. मात्र यामुळे कर्तव्यात कुठलीही कसूर न करता ते आपले काम करत आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्य पोलिस दलाकडून येणाऱ्या मागणीनुसार होमगार्डची जुळवाजुळव केली जाते. त्यानुसार पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकांची जबाबदारी संपवून दोन दिवसांपूर्वीच हे होमगार्ड चौथ्या टप्प्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. २२-२४ तासांचा सलग प्रवास अन् सततच्या धावपळीचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gASa-AAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬