[nagpur] - आमच्या पाच हजारांचे काय झाले?

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

डिसेंबर २०१५ पूर्वी मेट्रो रिजनमध्ये बांधण्यात आलेली अवैध बांधकामे वैध करण्यासाठी 'एनएमआरडीए'कडून मागविण्यात आलेल्या अर्जाला प्रतिसाद देत सुमारे १२ हजारांच्या घरात नागरिकांनी अर्ज दाखल केले. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. घर वैध करण्यासाठी आम्ही एनएमआरडीएकडे भरलेल्या पैशांचे काय झाले असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

कोणतेही बांधकाम करताना, टाउनशिप विकसित करताना नियोजन प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. एमआरटीपी अॅक्टनुसारच बांधकाम व्हावे असा नियम आहे. या सर्व नियमांना धाब्यावर बसवून झालेली सर्व बांधकामे अवैध ठरविण्यात आली आहे. 'एनएमआरडीए' (नागपूर महानगर विकास प्राधिकरण)कडून या घरांमध्ये राहणाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाने राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णय रद्द ठरविल्याने घरे वैध करण्याची प्रक्रिया स्थगीत करण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/WlYDYgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬