[nagpur] - दोन खुनांचा थरार

  |   Nagpurnews

व्यापाऱ्याची अपहरण करून हत्या; पतीच्या प्रेयसीला संपविले

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

रविवारी उघडकीस आलेल्या दोन हत्याकांडांनी उपराजधानी हादरली. भूपेंद्रसिंह ऊर्फ बॉबी माकन (४६,रा. दीक्षितनगर) या व्यापाऱ्याचे अपहरण करून हत्येनंतर त्याचा मृतदेह कोंढाळी येथील काठलबोडी परिसरात फेकून देण्यात आला. मारेकऱ्यांचा अद्याप पोलिसांना पत्ता लागलेला नाही. मात्र, या हत्येत एखाद्या जवळच्या मित्राचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. यासह कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेने पतीच्या प्रेयसीचा चाकूने भोसकल्याची घटना घडली.

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक बॉबी यांचे राणी दुर्गावती चौक परिसरात दुकान आहे. ते पत्नी रिंकू व मुले रौनक, ऋषी यांच्यासोबत दीक्षितनगर परिसरात राहात होते. गुरुवारी रात्री पत्नी रिंकू यांच्यासोबत जेवणाच्या पार्सलबाबत त्यांचा संवाद झाला. त्यांनी पार्सल सांगितले आणि त्यानुसार पार्सल घरी पोहोचले. मात्र, बॉबी यांनी रात्री फोन उचलला नाही. बॉबी तीन मोबाइल वापरत होते. काही काळानंतर त्यांचे तिन्ही फोन स्विच्ड ऑफ होते. त्यामुळे रिंकू यांनी शुक्रवारी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईमंदिराजवळ बॉबी यांची कार आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी बॉबी यांचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी कोंढाळी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या काठलबोडी परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. कोंढाळी पोलिसांनी मृतदेह काटोल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. जरीपटका पोलिस आणि गुन्हेशाखा या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी कुख्यात लिटील सरदारला चौकशीसाठी बोलविल्याची माहिती प्राप्त झाली. याखेरीज पवन मोरयानीचीही चौकशी होणार असल्याचे सांगितले जाते. अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/gBNKqgAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬