[nagpur] - नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’चा ताण

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

वैद्यकीय सेवेत परिचारिकांना पाठीचा कणा मानले जाते. विद्यार्थी दशेत असलेल्या अशा ४३ परिचारिका एकाच विषयात नापास झाल्या. हा ताण एवढ्यावरच थांबलेला नसून यात आता केस स्टडीची भर पडली आहे. या सर्वांना ऑक्टोबरपर्यंत केस स्टडीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक असल्याने इतक्या कमी दिवसात टार्गेट कसे पुर्ण करायचे, हा नवाच ताण त्यांच्या डोक्यावर येऊन पडला आहे. त्यामुळे परिचर्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी नैराश्याच्या उंबरठ्यावर जाऊन बसले आहेत.

सरकारने २००६ मध्ये सामान्य नर्सिंग अभ्यासक्रमाचा दर्जा वाढवून मेडिकलमध्ये बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला. राज्यात अशी चार सरकारी परिचर्या महाविद्यालये आहेत. पदविका ऐवजी पदवी मिळत असल्याने बीएसस्सी नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. मात्र बीएसस्सी नर्सिंगच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नापास करण्याच्या या धोरणामुळे शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ४३ विद्यार्थी एकाच मानसोपचार आरोग्य परिचर्या या विषयात नापास होत असतील तर या मागचे गौडबंगाल काय, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. धक्कादायक म्हणजे मानसोपचार विभागात गेल्या तीन वर्षांपासून हाच सुरू आहे. त्यात कॉलेज प्रशासनाने अचानक ऑक्टोबरपर्यंत केस स्टडी सादर करण्याचा फतवा नर्सिंग कॉलेज प्रशासनाने काढला. ऑगस्टमध्ये नवीन सत्र सुरू झाल्यानंतर सप्टेंबर पर्यंत लेखी (थेअरी) अभ्यासक्रम पुर्ण करण्यात येतो. यानंतर ऑक्टोबरमध्ये केस स्टडीला सुरुवात झाली. त्यावेळी केस स्टडीसाठी निवडलेले रुग्ण बरे होऊन घरी परतले असतील, परंतु त्यांची केस स्टडी करता आली नाही. मात्र आता अचानक विद्यार्थ्याना तत्काळ केस स्टडीचा अहवाल सादर करण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. यासाठी एक शिक्षक नेमण्यात आला आहे, मात्र ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती, त्यांनी ती पाळली नसल्याची चर्चा येथे आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/B16acAAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬