[nagpur] - मुख्यमंत्री निधीतील विकास कामांना प्रतिसाद नाही

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

मुख्यमंत्री विकास निधीतून शहरातील विविध विकास कामांसाठी सुमारे पाच ते सहा वेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याचे खापर नागपूर महानगर पालिकेच्या कंत्राटदार संघटनेने महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर फोडले आहे. यासंदर्भात नागपूर महापालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष सी. विजय नायडू यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र लिहून कंत्राटदारांना भेडसावत असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

नायडूनी लिहिलेल्या पत्रात महापालिकेच्या कंत्राटदारांपैकी एक कंत्राटदार एस. एस. पाटील यांना मिळणाऱ्या कामाच्या पद्धतीत बदल करण्यात आल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याबरोबर, मानसिक त्रासही सहन करावा लागला आहे. गेल्या वर्षभरात त्यांच्या कामात परस्पर बदल करण्यात आला आणि त्या कामांसाठी अतिरिक्त दर मंजूर करण्यात अभियंते फारसे इच्छूक नाहीत. अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणांमुळे कंत्राटदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचेही संघटनेतर्फे आयुक्तांना लिहीण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. काही कंत्राटदारांना जाणीवपूर्वकपणे अभियंत्यांकडून त्रास देण्यात येत आहे. अभियंत्यांच्या मर्जीनुसार त्यांच्याकडून काम करून घेण्यात येते. इतकेच नव्हे तर त्यांना आवश्यक असलेले नवे दरही लावू देण्यात येत नाहीत असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनाही समस्या भेडसावत आहेत. रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांना मुळ अनामत रक्कमेच्या पेक्षा अतिरिक्त १० टक्के अनामत रक्कम द्यावी लागत आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. तसेच तिसऱ्या पक्षाकडून पाहणीचे कारण सांगून कामाच्या निविदा काढण्यास वेळ लावण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर काम पूर्ण झाल्यानंतर त्याची पाहणी करण्यात येत नाही. इतकेच नव्हे तर अनेक कामे तिसऱ्या पक्षाकडून पाहणी न करता देण्यात येत आहे. तसेच या कामामध्येही अनामत रकमेच्या नावाखाली घेण्यात आलेली अतिरिक्त १० टक्यांची रक्कम अनेक दिवस रोखून ठेवण्यात येत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PpGOTwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬