[nashik] - कारागृहातील कैदी मतदानापासून वंचित

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी सोमवारी (दि. २९) मतदान होत आहे. परंतु, कारागृहातील कैद्यांना मतदान करता येणार नाही. कारागृहात असेपर्यंत कैद्यांचा मतदान अधिकार कायद्याने गोठवलेला असतो.

कैद्यांमध्ये शिक्षा झालेले (पक्के कैदी) आणि कोर्टात खटला सुरू असलेले (कच्चे कैदी) असे दोन प्रकार असतात. नाशिकरोड कारागृहात साडेतीन हजार कैदी आहेत. त्यामध्ये कच्च्या कैद्यांची म्हणजे न्यायलयीन बंद्याची संख्या जास्त आहे. कैदी पक्का असो की कच्चा, त्याला मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे कोणत्याच कारागृहातील कैद्यांना मतदान करता येणार नाही.

कैदेतून बाहेर आलेल्यांना सरकारी नोकरीदेखील मिळू शकत नाही. कारण या नोकरीत जाण्यापूर्वी पोलिस पडताळणी आवश्यक असते. कैद्याच्या नावे गुन्हा लागलेला असल्याने त्याला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. मात्र, तो स्वतःचा व्यवसाय-उद्योग, खासगी नोकरी करू शकतो. कारागृहात कैद्यांच्या पुनर्वसनासाठी विविध व्यवसाय प्रशिक्षणाच्या योजना आहेत. योगा, शिक्षण आदी त्याला मिळू शकते. त्यासाठी खासगी संस्थाही मदत करतात.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BS2MIgAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬