[nashik] - गितेंच्या सुरांची भुरळ

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या अक्षर मानव नाशिक शाखेच्या 'अड्डा' कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार संजय गिते यांच्यासोबत गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गीते यांची ओळख करून देताना त्यांचे बालपणीचे मित्र व अक्षर मानव संविधान राज्य प्रमुख मनोहर अहिरे म्हणाले की, संगीताच्या क्षेत्रातील नाशिकमधल्या दिग्गजांपैकी एक असे संजय गीते यांनी महाराष्ट्रातल्या सर्वच गायक संगीतकारांसोबत काम केले आहे आणि तरी सुद्धा कुठलाही अहंपणा न बाळगता आपला व्यवसाय आणि सामाजिक कार्य सतत करत आले आहे. यावेळी गिते म्हणाले की, आपल्याला स्वतःला सांभाळण्यासाठी प्रत्येकाला कुणी तरी हवं असत आणि शब्दांनी, सुरांनी आपलं जीवन सांभाळलं असं ते म्हणाले. बालपणाच्या संस्कारतून मला माझ्यातलं संगीत सापडलं. महाविद्यालय जीवनात कवितेला चाली लावण्यापासून त्यांनी सुरुवात केली. मग कवी शोधून कविता गात गेलो. यावेळी त्यांनी 'ते आयुष्य तेच आहे' ही गझल गाऊन दाखवली. उपाध्यक्ष नरेंद्र सोनवणे यांनी कार्यक्रमाची सांगता करताना गाणे म्हणून आभार मानले. कवी भीमराव कोते यांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला विजय निपानेकर, गणेश शिंदे, प्रसाद देशपांडे, सुदाम दीक्षित, आरती शिरवाडकर आदी उपस्थित होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/egx_wwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬