[nashik] - घरफोडीत दीड लाखांचा ऐवज लंपास

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संपूर्ण कुटुंब रात्री घरात झोपलेले असताना तिघा चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने ठेवलेली लोखंडी पेटी पळवल्याची घटना हिंगणवेढे (ता. जि. नाशिक) येथे रविवारी (दि.२८) पहाटे अडीच वाजता घडली. या घरफोडीत रमेश विनोबा धात्रक (वय ५८) यांच्या घरातील ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले आहेत.

रमेश धात्रक यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात या घरफोडीबाबत फिर्याद दिल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी अज्ञात तीन इसमांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या घरफोडीची माहिती मिळाल्यावर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक एस. सी. सोनोने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरापासून काही अंतरावर गेल्यावर या चोरट्यानी लोखंडी पेटी फोडून त्यातील १ लाख ४० हजार रुपये किंमतीची ७० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४ ग्रॅम वजनाची ८ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि ३ ग्रॅम वजनाची ६ हजार रुपयांची अंगठी असे एकूण ७७ ग्रॅम वाजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास शेळके करीत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KesIlQAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬